Biodata Maker marathi
✕

बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे - ललित प्रभाकर

Updated: शनिवार, 15 जून 2019 (16:40 IST)
 
माझ्या बाबांनी माझ्या सर्व गरजा अगदी मी न सांगता पूर्ण केल्या आहेत. काहीवेळा मी ओरडा पण खाल्ला आहे. पण त्यामागे त्यांचा हेतू नेहमी योग्य असायचा. बाबांनी मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. पण अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या माझ्या निर्णयाला त्यांचा पाहिजे तसा पाठिंबा नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. हे क्षेत्र खूप अस्थिर, अनिश्चित आहे. यात माझा टिकाव कसा लागेल याची काळजी त्यांना नेहमी असायची. आता मात्र माझा काम पाहून त्यांना माझा अभिमान वाटतो. मला घडवण्यात माझ्या बाबांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. मी त्यांचे कष्ट त्यांचे काम खूप जवळून पहिले आहे. अगदी कठीण काळातही बाबांनी हार न मानता मेहनत केली. एवढा सर्व काम करत असतांना सुद्धा त्यांच्या सोबत एक गोष्ट नेहमीच राहिली आणि म्हणजे त्यांचे हास्य. बाबांवर कितीही अवघड वेळ आली असली तरी ते नेहमी हसत असतात. हसून आलेल्या संकटाचा सामना ते करतात. त्यामुळे त्यांना कधीही 'स्माईल प्लीज' असे सांगावे लागले नाही. याउलट तेच सर्वाना 'स्माईल प्लीज' असा गोड सल्ला देत असतात. बाबांनी आता छान आराम करून त्यांचे सर्व छंद पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे. सर्वाना 'फादर्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: सरकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू करणार

रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागितली! नेमक प्रकरण काय?

बदलापूर : भटक्या कुत्र्यांच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळाला, १८ वर्षीय हर्षलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महाराष्ट्र एक स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड प्रणाली विकसित करणार; आता प्रत्येक फ्लॅट आणि घरासाठी स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' असेल

बीएमसी, कोर्ट आणि बिग बींच्या बंगल्याला धमक्यांचे ईमेल पाठवणार मास्टरमाईंड अमेरिकेतील ''सॉफ्टवेअर इंजिनिअर''

पुढील लेख
Show comments