बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 2 जुलै 2018 (09:04 IST)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक आता बंद होणार आहे. त्या ऐवजी आता सर्व सदस्य सर्वसंमतीने ही निवड होणार आहे. साहित्य महामंडळाच्या घटनेतही दुरुस्ती करण्यात आली आहे. घटक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतरच हा निर्णय लागू होणार आहे. त्याचबरोबर आगामी ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा किंवा यवतमाळ या ठिकाणी होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणुक प्रक्रियेमुळे साहित्य संमेलनात अनेक चांगल्या साहित्यिकांना अध्यक्ष होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे राजकारण न होता चांगला साहित्यिक अध्यक्ष म्हणून निवडला जावा असे या मागचा उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे साहित्य संमेलनात होणारे वाद बंद होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या निर्णयावरच वाद नको निर्माण करायला असे देखील बोलले जात जात आहे.