शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन'

भारतीय इतिहासातील 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे. भारतीय लोकशाही आज, 26 जानेवारी 2013 रोजी 63 वर्ष पूर्ण करत आहे. मात्र भारत सरकारसह भारतीय जनतेला या दिनांचा विसर पडत आहे. असे निदर्शनात आले आहे. 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला झाल्यापासून हा दिवस 'काळा दिन' म्हणून पाळत आहे. 
 
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली.
 
भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. 
 
गतवर्ष 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून शासन दरबारी हा दिवसाची 'काळा दिन' म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस 'काळा दिवस' म्हणून भारतीय जनतेमध्ये कायमचाच रूजला जात असून शासनाला आता संविधान दिनाचा पुरता विसर पडला आहे. 
 
देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, सारे भेद विसरून एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.