शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (10:58 IST)

.........मोर..........

peacock
आपला राष्ट्रीय पक्षी, हा काही मी मोरावर निबंध नाही लिहिणार आहे.पण मनात अचानक एक विचार चमकून गेला, की मोर म्हंटल्यावर कुठंतरी थुई थुई नाचणारा, रंगबिरंगी पिसारा असलेला, मनाला खुलवणारा मोरच डोळ्यासमोर येतो.
आपोआपच आपण ही रोमांचीत होतो, आंनदीत होतो. खरंच किती सामर्थ्य आहे न ह्याच्या असण्यात.
कविमनाचा तो सोबती आहे, बालगोपालांचा आवडता आहे, चित्रकाराची प्रेरणा आहे, नाचणार्याच्या आनंदाला उधाण आहे, प्रेमाची आर्त हाक आहे !
तर असं असावं न माणसाचं व्यक्तिमत्वही.असतात काही जण असे की त्यांची उपस्थिती ही आपल्या करता खूप असते, एक सकारात्मक जाणीव सतत अवतीभोवती असते, जगण्याची ऊमेद असते.
सर्वत्र आंनद पसरविण्याची क्षमता त्यांच्यात असते. मोर म्हटलं की खिन्न भाव कधीही मनास शिवत सुद्धा नाही, कुठंतरी काहीतरी विलोभनीय बघावयास मिळणार म्हणून खुश होतो आपण.
आणि म्हणून च राष्ट्रीय पक्षाचा मान ह्यास मिळाला असणार !! असं उगीचच मला वाटतं बर!
........म्हणून मनाचा पिसारा फुलवा आणि नाचा मनसोक्त "मोरा सारख" !! 
....अंगावर अलगद मोरपीस फिरविल्याचा आभास होऊन व्हा रोमांचीत.. ! 
.....ठेवा कुणाची आठवण म्हणून पुस्तकात मोरपीस अन द्या उजाळा त्या "क्षणांना"आठवून!
.......कित्ती सुंदर सुंदर गाणे आहेत मोरावर लिहिलेले ते गुंनगुणवुशी वाटतात न ! 
....आपली लाडकी पैठणी मोरशिवाय का पूर्ण वाटते आपल्याला, पदरावर मोर नसेल तर, ...हवी असते का अशी पैठणी आपल्याला?
....दारात एखादी मोराची सुंदर रांगोळी रेखाटली असली की, कित्ती बरं वाटतं न आपल्याला ! 
.....म्हणून तरआपली आपल्या बालपणापासून आपली आई मोराशी घट्ट मैत्री करविते, आणि शिकविते, "नाच रे मोरा ....."! होय न !! 
.....अश्विनी थत्ते.