बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (16:30 IST)

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना,
अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,
संजीवनी आसपासच आहे आपल्याच,
माहिती नाही तयांची, हा खेद मोठाच,
नानावीध व्याधी, बऱ्या होतात चुटकीसरशी,
अश्या कित्तीतरी आहेत या धरतीवरती,
यायला हवीय समज, ओळखू यायला त्या,
कित्ती आहेत बहुगुणी, आहेत औषधी त्या,
काहींचा तर नायनाट झाला, उगवल्या पुन्हा न कधी,
ज्या आहेत त्यांचं संवर्धन व्हायला हवंय आधी,
चला सारे मिळून कास धरू या यासाठी,
पुढं होऊ यात वनश्री चा हा ठेवा जपण्यासाठी !
"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"
....अश्विनी थत्ते.