शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

सावित्रीबाईंच्या पत्रातून कळून आलेला प्रसंग

काही महानगर सोडले तर देशातील अनेक भागांमध्ये आजदेखील आंतरजातीय विवाह करणे सोपे काम नाही. असे प्रेमी जोडप्यांबद्दल कळल्यावर वर्तमान काळात देखील ऑनर‍ किलिंगच्या नावावर खून होतात. त्यातून त्यात विवाहापूर्वी गर्भधारणा तर अत्यंत कलंकित मानलं जातं. अशात 1868 साली असे प्रकार तर गुन्ह्यात सामील होते आणि हे कृत्य मृत्युदंडाची शिक्षा देण्याएवढे गंभीर देखील.
 
अशीच एक घटना त्या काळात घडली जेव्हा एक ब्राह्मण गावात फिरून आपलं पोट भरत होता आणि तो गावातील एका मुलीच्या प्रेमात पडला. मुलगी पोटूशी झाली आणि गावातील लोकांना ही बाब कळत्याक्षणी दोघांना मारहाण करत गावाच्या गल्लीमध्ये फिरवत होते, ते त्यांच्या जीवावर उठलेच होते की तिथे पोहचली एक स्त्री. त्या महिलेने लोकांना ब्रिटिश सरकाराची भीती दाखवली आणि दोघांना सोडवले. तेव्हा लोकांना ब्राह्मण आणि निम्न जातीची मुलगी गावात राहतील हे मात्र मुळीच मंजूर नव्हतं. गावकर्‍यांनी दोघांना गावात शरण न देण्याचे ठरवले आणि दोघांनी ते मान्य देखील केले.
 
1868 मधील ही घटना घडली यात हैराण करणारे सारखे काही नाही परंतू हैराण करणार्‍यासारखी गोष्ट ही आहे की 37 वर्षाची महिला ज्यांनी सर्वांच्या विरोधात जाऊन दोघांचा जीव वाचवला आणि त्या स्त्रीचे नाव होते सावित्रीबाई फुले.
 
आंतरजातीय विवाह किंवा विवाहपूर्व गर्भधारणा अशा गोष्टींना सावित्रीबाई गुन्हा समजत नव्हत्या. त्यांच्यासाठी ती गर्भवती स्त्री कलंकित नव्हती आणि म्हणूनच त्या जोडप्याच्या बाजूने उभ्या राहिल्या. ही घटना त्यांच्या एका पत्रावरून उघडकीस आली जे त्यांनी आपल्या ज्योतिराव फुले यांच्यासाठी लिहिले होते. हे पत्र त्या काळात लिहिले गेले जेव्हा महिलांसाठी शिक्षण घेणे देखील पाप समजले जात होते.