शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:46 IST)

सण असो की समारंभ, पेय हेच खरं!

tea
लावली चटक गोऱ्यानी चहाची,
काळा माणूस करू लागला चाकरी त्याची,
हळूहळू करता झाला सवयी चा गुलाम,
चहा विना आता त्याच्या जीवनात न उरला राम,
सकाळ असो की संध्याकाळ, लागतोच चहा,
उरलेले नाही चहा विन त्याच्या आयुष्यात पहा,
सर्वच क्षणी त्याची उपस्थिती असतेच बरं,
सण असो की समारंभ, पेय हेच खरं!
काळा असला तरी चालेल बाबा!असें म्हणणारे,
दिवसातून कप च्या कप आहेत ढोसणारे!
वादळ ही येतात म्हणे चहाच्या कपातले!
इतका मिसळून गेलाय तो, भाग्य आपुले,
असो पण अर्ध्या कपात ही जीं कता येतं माणसाला,
ही किमया फक्त आणि फक्त जमली चहाच्या कपाला !!
समस्त चहा शौकींनांना समर्पित!!☕
......अश्विनी थत्ते