मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (15:35 IST)

SBI PO Recruitment 2020: SBI मध्ये 2000 पीओ पदांसाठी भरती, त्वरा करा

SBI PO Recruitment 2020: एसबीआय मध्ये प्रोबशनरी ऑफिसर (PO)पदांसाठी भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात आले आहे.

एसबीआय पीओ भरती 2020 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेत स्थळ sbi.co.in वर 4 डिसेंबर 2020 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 असेल.

या भरतीसाठी एसबीआय कडून प्रारंभिक परीक्षा 31 डिसेंबर 2020, 2, 4 आणि 5 जानेवारी 2021 रोजी ऑनलाईन घेण्यात येईल.

एसबीआयच्या भरती प्राथमिक परीक्षेचा निकाल जानेवारी 2021 च्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. एसबीआयच्या भरती प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना 29 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस पात्र ठरवले जाईल. मुख्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारी च्या तिसऱ्या किंवा चवथ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

एसबीआयच्या या भरतीत पीओ साठीची 2000 पदे भरली जाणार आहे. या पैकी 810 रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, 540 ओबीसी, 300 एससी, 200 ईडब्ल्यूएस आणि 150 रिक्त जागा एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता-
बँक पीओसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही  मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाचे/ सेमेस्टरमध्ये आहेत. ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की मुलाखतीला बोलवण्याच्या वेळी बॅचलर किंवा पदवीधराची डिग्री दाखवावी लागणार. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने  31.12.2020 पूर्वी पदवी पास असणे आवश्यक आहे.

अर्ज फी –
सर्व साधारण प्रवर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी अर्ज फी 750 रुपये निश्चित आहे. इतर आरक्षित प्रवर्गासाठी कोणतीही अर्ज फी देय नाही.

अधिक माहिती साठी पूर्ण भरती अधिसूचना वाचावी- एसबीआय पीओ भरती 2020 सूचना

अर्जाचा थेट दुवा - ऑन लाइन अर्ज करा.
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.