बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (22:10 IST)

रेनकोटची निवड करताना

पूर्वी पावसाळा आला की एकाच काळ्या रंगाची छत्री, तीसुध्दा अशा मराठी आठ अक्षरासारखी....! भली मोठी छत्री घेतली की एक-दोन माणसे त्याचातून आरामात पावसातून जायची. छत्री म्हणजे पावसापासून संरक्षण इतकाच त्याचा उपयोग. फार तर फार मोठ्यांसाठी आणी लहानांसाठी रेनकोट. तेही लहानांसाठी छानशी व्हरायटी. पण मोठ्यांसाठी मात्र विविधतेने नटलेले रेनकोट मिळणे मुश्किल. पण आता मात्र रेनकोट, छत्र्या या वेगवेगळ्या रंगात आणि ढंगात बाजारात उपलब्ध आहेत की, यांच्या स्टाईलने आबालवृध्दापर्यंत वेड लावले आहे. विविधतेने नटलेले रेनकोट पाहिले की मग त्याच्यात चॉईस हा आलाच.
 
पावसाळा म्हटले की पावसाळी चप्पल, रेनकोट अशी खरेदी आलीच. पावसाचा आनंद लुटायचा असेल तर छत्री किंवा रेनकोट घालून फेरफटका मारणे किंवा कॉलेज, ऑफिस, बिझनेससाठी घराबाहेर पडणे हे आलेच. पण रेनकोट खरेदी करतानासुध्दा त्यामध्येसुध्दा आपला लुक कसा सुंदर दिसेल याची काळजी घ्याला हवी.
 
महिलांसाठी वेगवेगळे कलरफुल रेनकोट हल्ली बाजारात पहायला मिळतात. छत्र्याही अगदी विविधरंगी असतात की रेनकोट आणी छत्री दोन्ही वापरायचा मोहच जात नाही. छत्र्यांमध्ये पूर्वी दांड्याची छत्री वापरली जायची. मग नंतर थोडा बदल करून फोल्डींगची छत्री आहे. पण कॉलेज स्टुडंसाठी रेनकोट फार सोयीचा वाटू लागला. त्यामध्येही मुलांमुलींसाठी जर्कीन तर काही पण वरती रंगबीरेंगी टॉप आणि स्कर्टचाही वापर करणे सोयीस्कर समजू लागले.
 
हा स्कर्टचा वापर करताना काही वेळा हा रेनकोट सोयीपेक्षा गैरसोयीचाच ठरू लागला. यामध्ये साडी किंवा सलवार कमीज, जींस पूर्णपणे भिजत असत.