1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (19:56 IST)

दुधी भोपळ्याची निवड करण्यासाठी टिप्स

how
आरोग्याच्या दृष्टीने दुधी भोपळा खूपच फायदेशीर आहे.दुधीचा समावेश आपल्या आहारात करावा.बऱ्याच वेळा दुधी विकत घेतो. परंतु आतून ती कडू निघते.ती आरोग्यासाठी हानिकारक असते.दुधीची निवड करताना ती कशी असावी, या साठी काही टिप्स सांगत आहोत जाणून घ्या.
1 दुधीचा रंग-दुधी ची निवड करताना त्याचा रंग फिकट हिरवा असावा.साल मऊ असावे.डाग असलेली दुधी निवडू नका.कापलेली नसावी.
 
2 आकार- दुधी भोपळा निवडताना त्याचा आकार अधिक मोठा किंवा अधिक लहान नसावा.दुधी हळुवार दाबून बघावे की मऊ तर झाली नाही.जास्त वजनी दुधी घेऊ नका.या दुधीचे बियाणे पिकलेले आणि कडू असतात. 
 
3 आतून दुधी अशी असावी - बऱ्याच वेळा वर चांगली दिसणारी दुधी आतून खराब निघते. एक चांगली आणि गोड असलेली दुधी आतून पांढरी असते. काही दुधी अशी असते की आतून काळी निघते. काळी असलेली दुधी खराब असते ती खाऊ नये. आरोग्यासाठी हानिकारक असते.