मंगळवार, 5 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (17:56 IST)

काल भैरव जयंती 2020 : भूत-बाधा दूर करणारे बाबा कालभैरव

शास्त्रानुसार भगवान काल भैरव यांचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला झाला होता. यंदाच्या वर्षी ही तिथी 7 डिसेंबर रोजी येत आहेत. याच दिवशी माध्यान्ह मध्ये भगवान शिवाच्या या अंशाचा जन्म झाला. हे शिवाचे 5 वे अवतार मानले जातात. भैरवाचा अर्थ आहे सर्व प्रकाराची भीती हरणारा आणि जगाचे संरक्षण करणारा. असे देखील मानले जाते की भैरव शब्दाच्या तीन अक्षरांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही शक्ती विद्यमान आहेत. भैरव हे शिवाचे गण आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात.
 
हिंदू देवतांमध्ये भैरवाचे खूप महत्त्व आहे. यांना काशीचे कोतवाल देखील म्हणतात. यांच्या शक्तीचे नाव 'भैरवी गिरिजा' आहे जी आपल्या भक्तांचे चांगले करते. या दिवशी त्यांचे दोन प्रकार आहेत. पहिले बटुक भैरव, जे भक्तांना अभय देणारे सौम्य रूपात प्रख्यात आहे. दुसरे काल भैरव जे की गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणारे आणि कठोर शिक्षा करणारे आहे.
 
सर्व संकटे दूर होतात - 
शिव पुराणात म्हटले आहे की 'भैरवः पूर्णरूपोहि शंकरस्य परात्मनः । मूढास्तेवै न जानन्ति मोहितारूशिवमायया।' म्हणजे भैरव हे परमात्मा शंकराचे रूप आहेत पण अज्ञानी मनुष्य शिवाच्या या मायेला भुलतात. नंदीश्वर म्हणतात की जे शिव भक्त शंकराच्या भैरव रूपाची उपासना दररोज करतो त्यांचे जन्मो-जन्मीचे पाप नाहीसे होतात. याचे स्मरण आणि दर्शन केल्यानं प्राण्याचे सर्व त्रास आणि दुःख नाहीसे होऊन तो शुद्ध होतो. आख्यायिका आहे की यांच्या भक्तांचा नाश करणारे किंवा यांच्या भक्तांना त्रास देणाऱ्यांना तिन्ही लोकात आश्रय मिळू शकणार नाही. 
काळ देखील ह्यांना भिऊन असतो. म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ, तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी देखील म्हणतात. ह्यांची पूजा केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती, जादू-तोटके, भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही तर यांची पूजा केल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढतो.
 
पूजा कशी करावी -
* या दिवशी भगवान शिवाच्या या अंशाची कालभैरवाची पूजा करणं विशेष फळदेणारे असतं.
 
* कालाष्टमीच्या दिवशी सकाळी ब्राह्ममुहूर्तात उठून नित्यकर्म करून शुद्ध होऊन स्वच्छ कपडे घालून शक्य असल्यास गंगा जल पाण्यात घालून अंघोळ करा.
 
* भैरवाला प्रसन्न करण्यासाठी उडीद डाळ किंवा या पासून बनलेली मिठाई जसं की इमरती, गोड पुए किंवा दूध मेव्याचा नैवेद्य दिला जातो. जुईचे फुल यांना आवडतात.
 
* कालिका पुराणानुसार भैरवजींचे वाहन श्वान म्हणजे कुत्रं आहे, म्हणून या दिवशी विशेष करून काळ्या कुत्र्याला गोड वस्तू खाऊ घातल्यानं भैरवजींची कृपा मिळते.
 
* कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या पूजेसह भगवान शिव देवी आई पार्वती आणि शिव परिवाराची पूजा करावी.
 
* भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कालभैरवाष्टकचे वाचन करावे, असं केल्यानं सर्व प्रकारचे दुःख आणि त्रास दूर होतात.
 
* या दिवशी भगवान काल भैरवांना 7 किंवा 11 लिंबूची माळ अर्पण केल्यानं व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. पूजा केल्यानंतर घोर-गरिबांना दान द्यावे.
 
काशीचे कोतवाल आहे -
भगवान विश्वनाथ हे काशीचे राजा आहे आणि कालभैरव या नगरचे कोतवाल मानले जातात. म्हणून ह्यांना काशीचे कोतवाल म्हणतात. ह्यांच्या दर्शनाच्या शिवाय बाबा विश्वनाथाचे दर्शन करणे अपूर्ण मानतात. म्हणून नेहमी बाबा विश्वनाथाचे दर्शन केल्यावर कालभैरवाचे दर्शन करावे.