शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By चंद्रकांत शिंदे|

हापूस ने जमवला एक कोटींचा गल्ला

WD
मराठी चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊ लागला आहे. हिंदी चित्रपटांच्या तोडीस तोड मराठी चित्रपट धंधा करू लागले आहेत. नटरंग, मी शिवाजे राजे भोसले बोलतोय. शिक्षणाच्या आयचा घो, झेंडा चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर प्रचंड गल्ला जमवला होता. गेल्या शुक्रवार प्रदर्शित झालेल्या हापूसने ही एका आठवड्यात एक कोटी रुपयांचा व्यवसाय करून यशाचा झेंडा कायम ठेवला आहे. २५ जिल्ह्यातील १७२ चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या हापूसचे पहिल्या आठवड्याचे कलेक्शन एक कोटी रूपये झाले आहे.

हापूसच्या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होऊनही त्याने ही करामात केली आहे. खरे तर जूनमध्ये शेतीच्या कामाची धांदल, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेशाची धांदल असतानाही चित्रपटाचा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. हापूसची निर्मिती एवरेस्ट एंटरटेनमेंटने केली आहे. एवरेस्टनेच यापूर्वी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घोची निर्मिती केली होती. हापूसने एवरेस्टने कोटीच्या व्यवसायाची अनोखी हॅटट्रिक केली आहे. संजय छाब्रिया द्वारा निर्मित आणि अभिजीत साटम द्वारा दिग्दर्शित हापूसने मोठ्या जोमाने दुसर्‍या आठवड्यात प्रवेश केला आहे.