रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By

चित्रपट परीक्षण : डॉ. तात्या लहाने

चरित्रपट बनवणं एकाच वेळी सोपं आणि अवघड दोन्ही असतं. सोपं अशासाठी की ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा बनवायचाय, त्याची जीवनकथा व त्यातील प्रसंग आपल्या डोळ्यांसोर असतात आणि कठीण अशासाठी की त्या व्यक्तीच्या आयुष्यातील बर्‍या-वाईट प्रसंगांची नीट कलात्मक सांगड घालता आली नाही, तर सिनोचा तोल बिघडण्याची शक्यता असते. 'डॉ. तात्या लहाने' हा सिनेमा बघताना असंच काहीसं होतं. हुकुमाचे सगळे एक्के हातात असताना लेखक-दिग्दर्शकाने हा डाव गमावला आहे. सिनेमा बनवण्यासाठी चरित्रनायकाच्या आयुष्यात संघर्षाचे आणि यशाचे, दुःखाचे आणि सुखाचे जे-जे नाट्यात्मक प्रसंग हवेत, ते सारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या आयुष्यात आहेत. लहाने यांच्या जन्मापासून त्यांना पद्मश्री मिळेपर्यंतचा प्रवास या सिनेमात   चित्रित करण्यात आला आहे. मोतीबिंदूच्या एक लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करणारे लहाने गेली अनेक वर्षं फक्त एका किडनीवर आहेत आणि तीही त्यांच्या आईने दिलेली किडनी आहे. हा नाट्यात्मक प्रसंग सिनेमात आहे, परंतु त्याचा प्रभावी वापर लेखक-दिग्दर्शकाला करुन घेता आलेला नाही. एका अभावग्रस्त शेतकर्‍याच्या घरात झालेला जन्म,पोटासाठी भाकरीऐवजी प्रसंगी माती खायची आलेली वेळ, मोलमजुरी करुन पूर्ण केलेलं वैद्यकीय शिक्षण, त्यानंतर नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून मिळवलेली जागतिक ख्याती आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी तात्यारावांनी पिंजून काढलेला महाराष्ट्र... हे सारंच खरंतर लार्जर दॅन लाइफ होतं आणि आहे. मात्र त्याचा सशक्त वापर करुन न घेतल्यामुळे एक सरळसाधी हेलावणारी जीवनकथा एवढाच या सिनोचा ठसा उटतो.