विविध कोळी
1 हवाईयन हॅप्पी-फेस स्पायडर / हसणारी कोळी - हवाई मध्ये अशी कोळी आढळते ज्याला बघून असं वाटते की ती बघून हसत आहे, म्हणून त्याला हवाईयन हॅप्पी-फेस स्पायडर नाव दिले आहे.पण दुर्देवाची गोष्ट अशी आहे की ही हसणारी कोळी आता दुर्मिळ होतं आहे.
2 जगातील सर्वात विषारी कोळी ब्राझिलियन वन्डरिंग स्पाइडर किंवा बनाना स्पायडर आहे ही कोळी अन्न शोधायला मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळते. ही कोळी एवढी विषारी असते की हिच्या विषाचे थोडे प्रमाण देखील माणसाचा जीव घेण्यासाठी पुरेसे आहे.
3 व्हील स्पायडर- जेव्हा एक व्हील स्पायडर किंवा कोळी घाबरते तेव्हा आपले पाय आत दुमडून घेते आणि वाळू वर लोळते.
4 क्रॅब स्पायडर - कोळीची एक प्रजाती क्रॅब स्पायडर सरड्या प्रमाणे जागेच्या अनुरूप रंग बदलते.
5 बघीरा किपलिंगी- कोळी ही मांसाहारी प्राणी आहे. पण बघिरा किपलिंगी ही जगातील एकमेव अशी कोळी आहे, जी शाकाहारी आहे.
6 वॉटर स्पायडर- ही एकमेव अशी कोळी आहे जे आपले संपूर्ण आयुष्य पाण्यात घालवते. ही डायविंग बेल बनवते, ज्याच्या साहाय्याने ही पाण्यात राहते आणि जळमट विणते.
7 फॅनल वेब स्पायडर- ही एक खूपच आक्रमक कोळी आहे लगेच लोकांवर हल्ला करून चावते. ह्या कोळीच्या विषाने माणूस 15 मिनिटातच मरण पावतो.
8 ब्लॅक विडो स्पायडर- ह्या कोळीचे चावल्यावर घेतल्यानं मज्जातंतू शी निगडित आजार होतात, जसं- उच्च रक्तदाब, जीव घाबरणे इत्यादी.
9 बर्ड ड्रॉपिंग स्पायडर- ह्या कोळीला हे नाव म्हणून दिले आहे कारण ही कोळी विष्टा प्रमाणे दिसते. त्यामुळे पक्षी देखील ह्याला खाऊ शकत नाही.
10 पाटु मार्पलेसी- जगातील सर्वात लहान कोळी आहे.ही एवढी लहान आहे की पेन्सिलच्या मागील टोकात अशा प्रकारच्या 10 कोळी येऊ शकतात.