शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

हे तीन संकेत, आपल्यासाठी शुभ काळ घेऊन येतील

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात घडणारा काळ वाईट किंवा चांगला असतो. अनेक लोकांप्रमाणे एक काळ सामान्यदेखील असतो ज्यात चांगली किंवा वाईट कोणती गोष्ट घडत नसते. परंतू जो काळ वाईट नाही त्याला चांगला काळ म्हणायला हरकत नाही. परंतू अनेकदा अशा काही घटना घडतात ज्या संकेत देतात की आपला भविष्यकाळ सुखद राहील. तर जाणून घ्या संकेत:
 
अनेक लोकांना सकाळी उठल्यावर आरशात चेहरा बघण्याची सवय असते. तर उठल्यावर आरशात चेहर्‍यावर चमक आणि आत्मविश्वास दिसल्यास आपले वाईट दिवस सरणार आहेत असे समजावे. आपण हाती घेतलेलं कार्य लवकरच यशस्वीरीत्या पूर्ण होणार असे ही याचा अर्थ असू शकतो.
 
गाय पवित्र पशू असून हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे. अशात आपल्याला स्वत:च्या बागेत किंवा शेतात गाय चरत असताना दृष्टीस पडली तर समजा देवी लक्ष्मीने साक्षात संकेत पाठवले आहेत.
 
रस्त्यात घोड्याची नाळ, चार पाने असलेली गवत किंवा शिक्का सापडल्यास सांभाळून ठेवावे. या वस्तू आनंदी जीवनाचे संकेत आहे.