रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Bhagar भगर खाण्याचे फायदे

Mordhan Rice Health Benefits भारतात पुजा- पाठ, सण आणि उपवासात भगरचा वापर केला जातो. बरेच लोक याला मोरधन किंवा वरीचे तांदूळ असेही म्हणतात. भगर शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. भगरीमध्ये असलेले पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवून हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
 
भगर ग्लूटेन फ्री धान्य आहे. जे लोक ग्लूटेनचे सेवन करत नाहीत त्यांनाही भगर खाण्याचा सल्ला दिला जातो. कर्बोदके, जीवनसत्त्वे अ, क, ई आणि प्रथिने पुरेशा प्रमाणात मोरधनमध्ये आढळतात. लहान मुले, वृद्ध लोक आणि नियमित आजारी असलेल्या लोकांना देखील भगर खाण्याचा सल्ला दिला जातो. 100 ग्रॅम मोरधन मध्ये प्रथिने 11.6 ग्रॅम, कार्बोहायड्रेट 74.3 ग्रॅम, चरबी 5.8 ग्रॅम, लोह 4.7, कॅल्शियम 14 मिग्रॅ आणि फॉस्फरस 121 मिग्रॅ असतं. रोजच्या आहारात भगर समाविष्ट केल्याने शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.
 
भगरीचे फायदे
ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी भगर खूप फायदेशीर आहे. सामान्य तांदळाच्या तुलनेत यातचरबी कमी प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात एक ते दोन वाट्या भगर घेऊ शकता.
 
भगरीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. कॅल्शियम हाडांच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत त्यांना नियमितपणे भगर खाण्याचा सल्ला दिला जातो.
 
इतर कोणत्याही तांदूळ किंवा पिठाच्या तुलनेत मोरधन मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर हे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. घरातील लहान मुले आणि वडिलधार्‍यांना पोटदुखी, गॅस आणि अन्न पचायला त्रास होत असेल त्यांना भगर खाण्याचा सल्ला दिला जातो.
 
शरीरात प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी भगरीचे सेवन केलं जातं.
 
भगरमध्ये आढळणारे पोषक घटक शरीरात इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतात आणि हाडे मजबूत करतात.