शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मार्च 2023 (16:00 IST)

गॅस स्टोव्ह बंद असतानाही विषारी वायू बाहेर पडतो, आरोग्याला धोका

आपण स्वयंपाकघरात अन्न शिजवून झालं की गॅस स्टोव्ह बंद करतो परंतु आपल्या हे माहित आहे का की बंद स्टोव्हमधूनही विषारी वायू बाहेर पडते. आणि स्वयंपाकघरात खिडकी नसेल तर दम्याचा धोका देखील असू शकतो. याचा मुलांना जास्त धोका असू शकतो.
 
काही दशकांपूर्वी देशातील मोठी लोकसंख्या स्वयंपाकासाठी कोळसा, लाकूड, रॉकेल याचा वापरत करत असे. या धुरामुळे आरोग्याला धोका होताच तर अलीकडे जागोजागी एलपीजी गॅसचा वापर केला जातो. सध्या आपल्या देशात 30 कोटींहून अधिक एलपीजी आणि पीएनजी ग्राहक आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का की स्वयंपाक करताना गॅस स्टोव्हमधून हानिकारक नायट्रोजन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो. हा वायू श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. यामुळे लोकांना दमा आणि श्वसनाचे इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नाही तर शेगडीतून मिथेन, बेंझिन, हेक्सेन, टोल्युइन हे घटकही बाहेर पडतात. ज्यामुळे दमा आणि कर्करोग यांसारख्या रोगांचा धोका असतो.
 
डॉक्टरांप्रमाणे जर एखाद्या आधीच दमा असेल किंवा श्वास संबंधी समस्या असेल तर गॅसच्या संपर्कात आल्याने त्यांचा आजार आणखी जोर पकडू शकतो. अशात वारंवार खोकला येणे, श्वास लागणे, जोरात श्वास घेणे यासारखी लक्षणे नियमित दिसून येऊ शकतात.
 
गॅस स्टोव्हचा धोका केव्हा वाढतो
गॅस स्टोव्हचा धोका अनेक गोष्टींवर अवलंबून असतो जसे. स्वयंपाकघराती वेंटिलेशन, जुना किंवा खराब गॅस स्टोव्ह आणि इतर. योग्य वेंटिलेशन आणि चांगला स्टोव्ह असल्यास धोका कमी होतो.
 
स्टोव्ह बंद असतानाही गॅस बाहेर येतो
2022 मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्च प्रमाणे गॅस स्टोव्ह बंद असल्यावरही त्यातून सतत मिथेन गॅस बाहेर पडते. शक्तीशाली ग्रीनहाउस गॅसचा रिसाव करत असते. 
 
ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार ही गॅस घरात वेंटिलेशन योग्य नसल्यास नायट्रोजन ऑक्साईड तयार होत असल्यामुळे श्वास संबंधी आजार वाढू शकतात.
 
इंडक्शन स्टोव्ह वापरणे सुरक्षित
एलपीजी गॅसऐवजी इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन स्टोव्ह वापरणे अधिक सुरक्षित असल्याचे मानले जात आहे. जर्नल ऑफ ऍलर्जी आणि क्लिनिकल इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार गॅस स्टोव्हऐवजी इलेक्ट्रिक स्टोव्ह वापरल्याने दम्याचा धोका कमी होतो.
 
स्वयंपाकघरात एक्जॉस्ट व्यवस्था आवश्यक
तुम्ही एलपीजी गॅस स्टोव्हवर स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाकघरात चांगल्या दर्जाचे एक्जॉस्ट असावे. किचन चिमनी फिल्टर म्हणून काम करते. स्वयंपाकघरात असलेल्या धूरातून वाफ आणि उष्णता बाहेर पडते. तसेच स्वयंपाकघरातही एअर प्युरिफायर वापरणे देखील योग्य ठरेल.