बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 12 जून 2019 (15:50 IST)

मृत्यूला निमंत्रण देणारी आहे वारंवार स्मार्टफोन पाहण्याची सवय

जर आपल्याला देखील वारंवार स्मार्टफोन पाहण्याची सवय असेल तर सावधगिरी बाळगा, ही सवय आपलं वय कमी करू शकते. एका नवीन रिसर्चमध्ये हे समोर आलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका लेखानुसार लोकांच्या फोनसाठी वाढत्या क्रेझमुळे डॉक्टरांची चिंता देखील वाढली आहे, कारण की यामुळे त्यांचे वय कमी होत आहे. रिसर्चनुसार दररोज लोक सरासरी 4 तासांपर्यंत फोनमध्ये पाहत राहतात. 
 
शास्त्रज्ञांच्या मते आपण फोनबद्दल विचार करताच, आपल्याला तणाव जाणवतो आणि मग ते कमी करण्यासाठी आपण आपलं वारंवार फोन तपासता, पण फोन तपासण्याने तणाव आणखी वाढतं. कोणताही त्रासदायक मेसेज, कोणतेही चुकलेले काम किंवा एखादी भीतिदायक हेडलाईन वाचल्या बरोबरच कोर्टिसोल हार्मोनची पातळी वेगाने वाढते. हळूहळू फोन व्यसन झाल्यामुळे हे तणाव वाढत जातं आणि आपण अकाली मृत्यूकडे वळतो.
 
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की फोनमुळे वाढत्या कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय केले पाहिजे. आपल्या फोनचे नोटिफिकेशन बंद करू शकता किंवा आपल्या फोनला कुरूप बनवून ठेवा यामुळे त्याला पाहण्याची इच्छा होणार नाही आणि जर फोनचा व्यसन खूप गंभीर असेल तर डिजिटल डिटॉक्स प्रोग्रामाची मदत घ्या.
 
स्टॅनफोर्ड मनोचिकित्सक केली मॅकगोनिगल यांच्या मते फोन व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी माइंडफुलनेस (ध्यान लावणे) चा प्रयत्न करा. श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि असं विचार करा की आपण सर्फिंगसारखे काही मनोरंजक कार्य करीत आहात. अभ्यासामुळे मेंदू नियंत्रित करा, ज्यामुळे आपली फोन पाहण्याची इच्छा कमी होईल.
 
आपण सोशल मीडियावर पोस्ट टाकणे कमी करु शकता. अनेकदा एखादी पोस्ट टाकल्यावर त्यावर लोकांची प्रतिक्रिया बघण्यासाठी आपण वारंवार फोन उघडून बघत असता. अनेकदा कमी लाइक्स, कमी कमेंट्स किंवा उलटसुलट टिप्पणी वाचून देखील आपलं मन व्यथित होतं, मूड जातं. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो.
 
तसेही बघतिले तर फोनवर व्यक्ती एका प्रकारे र्व्हच्युल लाईफ जगत असतो, परंतू सतत आपल्यासमोर येणार्‍या घटना, घडामोडीमुळे एकाग्रता लागत नाही. मन बैचेन राहतं. चित्त पळ काढतं त्यामुळे कुठलंही काम व्यवस्थि पार पाडणे कठिण जातं. म्हणूनच स्वत:वर ताबा ठेवून कमीत कमी किंवा आवश्यक असल्यास स्मार्टफोन वापरणे स्वत:साठी च नव्हे तर येणार्‍या पीढीसाठी देखील योग्य ठरेल.