आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी

cooking utensils
Last Updated: मंगळवार, 31 मार्च 2020 (12:47 IST)
आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच वैदिक, आयुर्वेदशास्त्रावरील विविध ग्रंथ तसेच पाकशास्त्रावरील ग्रंथांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्यार भांड्यांकडे विशेष लक्ष दिलेले दिसते.

आयुर्वेदानुसार, सोन्याच्या भांड्यात अन्न ठेवल्याने ते निर्वषी, बलवर्धक होते, सर्व धातूंची पुष्टी करते. चांदीच्या भांड्यातील जेवण त्रिदोषशामक असून ते मेंदू व डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच कांस्याच्या भांड्यातील जेवण त्रिदोषनाशक, बुद्धिवर्धक असून ते रक्तशुद्धी करते. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी लोखंडी पात्रात जेवण शिजवावे, असे आयुर्वेद शास्त्रात म्हटले आहे. आयुर्वेदात तांबे व पितळ हे औषधी धातू म्हणून ओळखले जातात. तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वातशामक, स्मृतिवर्धक असतो. तांबे आणि जस्त मिश्रित धातू म्हणजे पितळ. धन्वंतरीला पितळ जास्त प्रिय होते म्हणून त्याला नैवे दाखवताना पितळेची थाळी वापरली जाते, असे म्हटले जाते. पितळेच्या भांड्यात जेवल्याने वायू-कफ दोष नाहीसा होतो. आयुर्वेदात आणि पाकशास्त्रावरील विविध ग्रंथांमध्ये मातीची भांडी ही स्वयंपाकासाठी सर्वश्रेष्ठ सांगितली आहेत. त्यातून शरीरास कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, मॅग्रेशिअम, गंधक मिळते.
अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात. पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते. सामान्यतः राजघराण्यांमधून सोने व चांदीची भांडी आवर्जून वापरत, तरसर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दगड, माती, तांबे व पितळेची भांडी वापरली जात असत. कधी काळी घरची श्रीमंती ही स्वयंपाकघरातील भांड्यांवरून ठरत असे. एखादे धातूचे भांडे चेमले तर ठोकून पूर्ववत केले जाई आणि फुटलेच तर त्याला डाग लावून पुन्हा वापरले जाई. मात्र काळाच्या ओघात तांबे- पितळ महाग झाल्याने तसेच लोखंडी भांड्यांना गंज येत असल्याने या सर्व भांड्यांची जागा स्टेनलेस स्टीलच्या आणि अॅयल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. सध्याच्या वेगवान जीवनपद्धतीत (फास्ट लाईफस्टाईल) नॉनस्टिक, उष्णतेमुळे न फुटणार्याच पायरेक्ससारख्या काचेच्या आणि ‘ओव्हन फ्रेंडली' सिरॅमिक्सच्या भांड्यामुळे स्वयंपाक करणे सोपे झाल्याने, घरातील जुनी भांडी एक तर ती अडगळीच्या खोलीत जाऊन पडत आहेत किंवा मोडीत निघत आहेत. मात्र ही भांडी म्हणजे केवळ स्वयंपाक रांधण्याचे साधन नसून तत्कालीन सामाजिक, आर्थिक इतिहास समजावून घेण्याचे एक माध्यमही आहे. अनेकदा या भांड्यांवरून कुटुंबाचा इतिहास समजतो. नवीन भांडे घेत असताना त्यावर आवर्जून नावव तारीखही नोंदवली जात असल्याने त्यावरून आपल्या कुळाचा इतिहास, तत्कालीन भाषेचा-लिपीचा विकास ज्ञात होतो.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

98 किलो वजनाचा हा माणूस वजन कमी करून फिटनेस कोच बनला, जाणून ...

98 किलो वजनाचा हा माणूस वजन कमी करून फिटनेस कोच बनला, जाणून घ्या
आजच्या जीवनशैलीत आणि स्पर्धेच्या युगात लोक तणावाखाली राहणे अगदी सामान्य झाले आहे. त्याच ...

एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!

एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!
काहीतरी तुज सांगावं, म्हणून कागदावर लिहिलं, तू फक्त शब्दच वाचले, बाकी न तुज ...

Career Tips : बी फार्मसी मध्ये करिअर बनवा, पात्रता ...

Career Tips : बी फार्मसी मध्ये करिअर बनवा, पात्रता ,अभ्यासक्रम जाणून घ्या
गेल्या काही वर्षांपासून मेडिकल फार्मसी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. फार्मसी ...

Maharashtra Police Bharti 2022 :महाराष्ट्र पोलीस मध्ये ...

Maharashtra Police Bharti 2022 :महाराष्ट्र पोलीस मध्ये सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची भरती
महाराष्ट्र पोलीस मध्ये सरकारी नोकऱ्या आहेत. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये ...

Marriage Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी ...

Marriage Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो लग्नाच्या मनापासून हार्दिक ...