शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

स्वप्नदोष दूर करण्याचे काही घरतगुती उपाय!

वयात येणाऱ्या मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये स्वप्नदोष ही एक समस्या होवून जाते. यावर मात करण्यासाठी काही उपाय केले तर यातून सुटका होण्यास मदत होते.
 
स्वप्नदोष ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. 
 
आल्याचा रस 2 चमचे, कांद्याचा रस 3 चमचे, मध दोन चमचे, 2 चमचे गायीचे तूप यांचे मिश्रण सेवन करा. यामुळे स्वप्नदोष दूर होतो तसेच वीर्यातही ताकद येते.
 
कडूलिंबाचा पाला खाल्यानेही स्वप्नदोष दूर होतो. 
 
आवळ्याचा मुरांबा रोज खावा आणि गाजराचा रस प्राशन केला पाहिजे. 
 
तुळस ही औषधी आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो. तुळशीचे मूळ बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने लाभ होतो. तुळशीचे मुळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या मंजुळा घ्याव्यात.
 
लसूण ही गुणकारी आहे. लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळून घ्याव्यात. थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा. 
 
ज्येष्ठमधाचे चूर्ण अर्धा चमचा दूधासोबत घ्यावे. १० ते १२ तुळशीची पाने रात्री पाण्यासोबत घ्यावीत. रात्री एक लीटर पाण्यात त्रिफळा चूर्ण भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर सुती कापड्याने ते गाळून घेऊन ते प्यावे. त्यामुळे तजेलपणा येतो. यामुळे स्वप्नदोष दूर होतो शिवाय वीर्यही सक्षम होते.