1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (14:22 IST)

पर्याय तुरटीचा

दूषित पाणी ही पावसाळ्याच्या दिवसातील मुख्य समस्या आहे. दिसण्यात स्वच्छ निर्मळ असलेले पाणी, किती दूषित आहे हे सहजपणे समजून येत नाही. कपड्याचे गाळून घेतलेले पाणी पूर्णपणे स्वच्छ मानणेसुद्धा चुकीचे आहे. या कारणानेच पोटाच्या तक्रारी, कावीळ, मलेरिया यांसारखे आजार घेरु लागतात. कधी कधी तर या रोगांची साथ येते. 
 
तुरटीचा उपयोग करून दूषित पाण्याने होणार्‍या रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. तसे पाणी उकळून, थंड करून पिण्याने सुद्धा रोगांपासून बचाव होऊ शकतो, परंतु तुरटीचा उपयोग एक स्वस्त, सोपा आणि त्वरित परिणाम देणारा उपाय आहे. 
 
तुरटीचा उपयोग पिण्याच्या पाण्याबरोबरच ओघोळीच्या पाण्यातही करणे स्वास्थ्यासाठी लाभकारीआहे. कित्येक वेळा कपड्याने गाळून घेऊनही पाण्यातील छोटे छोटे जीवाणू पूर्णपणे दूर होत नाहीत. पाण्यामध्येच राहतात. जेव्हा या पाण्याने स्नान केले जाते तेव्हा डोळे, नाक, तोंड, कान आर्दीमध्ये हे पाणी जाऊन शरीरासाठी नुसानकारक ठरते. खास करून या पाण्याने कानामध्ये फंगस होते. हे टाळण्यासाठी पाण्यावरून पाच ते सात वेळा तुरटीचा खडा फिरवावा आणि जळजवळ एक तास पाणी स्थिर होण्यासाठी ठेवावे. 
प्रियांका जाधव