रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2022 (13:59 IST)

मराठी भन्नाट जोक

joke
एकदा एका शाळेंत शिक्षण अधिकारी  शाळा तपासायला आले. 
एका वर्गांत त्यांनी फळ्यावर ‘NATURE’ अशी अक्षरे लिहिली
 आणि एका मुलाला विचारले :
हा काय शब्द आहे?
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला ” नटुरे”.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला. सर्व मुलांनी तेच सांगितले “नटुरे”.
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले : हा काय प्रकार आहे?
शिक्षक उत्तरले : पोरं अजून ‘मटुरे’ (mature) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.
अधिकारी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले : जाऊ द्या हो साहेब !!! 
या गोष्टीचा त्यांच्या ‘फुटुरे’ (future ) वर 
कांहीच परिणाम होणार नाही
Edited By - Priya Dixit