गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (14:08 IST)

थोडीशी गंमत Fun Time

१) स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..
 
२) काही चेहरे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी भाग पाडतात..
 
3) काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.
 
४) रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..
 
५) चष्मे लावणाऱ्या लोकांचं अर्ध आयुष्य.. "माझा चष्मा कुठं आहे" हे शोधण्यातच निघून जातं.. 
 
६) तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..
 
७) मटणाच्या आणि दारुच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला.. Corona ची किंचित ही भीती नसते..
 
८) कुंडली  खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा  बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..
 
९) ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..
 
१०) लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..
 
११) आज कालच्या पोरा पोरींपेक्षा संस्कारी तर मच्छर आहेत.. सातच्या आत घरात येतात..
 
१२) ज्यांचं मन साफ असतं ना.. त्यांना रोज आंघोळ करायची गरज नसते...
 
१३) जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..
 
१४) आयफोन वाल्यांच अर्ध आयुष्य.. मिरर सेल्फी काढण्यात अन् आयफोन चा EMI भरण्यातच निघून जातं...
 
१५) वर्षभर Dp न बदलणारे.. जेव्हा २-२ दिवसात Dp बदलतात.. तेव्हा समजून जायचं.. कोणीतरी नवीन  ' add झाली आहे..
 
१६) पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.. 
 
१७) गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 
 
१८) काही लोक रोज सकाळी लवकरच उठतात.. फक्त त्यांना शुद्धीवर यायला १-२ तास लागतात.. 
 
१९) आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..
 
२०) जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..
 
२१) जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षाही खराब आहे..
 
आजचे ज्ञान समाप्त,पटल तरच हो म्हणा............