बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

अवघड मराठी! (पु.लं.देशपांडे)

एकदा सौ.फडकेंनी पु.लं.देशपांडेंना प्रश्न केला कि "स्वल्पविराम म्हणजे काय नेमकं?"
पु.लं.देशपांडे म्हणाले," वेळ आल्यावर नक्की सांगेन"
काही दिवसांनंतर पु.लं.देशपांडे सौ.फडकेंना म्हणाले,
"तुम्ही माझी बायको मी तुमचा नवरा आपण सिनेमा बघायला जावू."
यावर सौ.फडके भडकल्या.
त्या उद्गारल्या,
" हे काय अभद्र बोलत आहात तुम्ही?"
तेव्हा पु.लं.देशपांडेंनी उत्तर दिले,
"माफ करा स्वल्पविराम द्यायलाच विसरलो की! 
मला असं सांगायचं होतं कि .....
तुम्ही,माझी बायको,मी, तुमचा नवरा,आपण सिनेमा बघायला जाऊ!
सौ.फडके नतमस्तक झाल्या
 
- सोशल मीडिया