शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

व्हाट्‍सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात,

व्हाट्‍सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात,
 
एक सासरचा, एक माहेरचा..
 
पुरुष आपल्या सासरच्या ग्रुपवर अत्यंत गप्प आणि उदासीन असतात, अधूनमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एखादा पाचकळ विनोद सोडला तर ते ना पोस्ट वाचतात ना काही लिहितात.
 
स्त्रियाही आपल्या सासरच्या ग्रुपवर काही लिहीत नाहीत, अधूनमधून फॉरवर्ड टाकतात, पण बारकाईने वाचत मात्र असतात शिवाय आपल्या नणंद, जावा, चुलत-आते सासवा वगैरे खास प्रेमाच्या माणसांचे बदललेले DP नक्की पाहत असतात.
 
याला पुढच्या युद्धासाठी दारुगोळा जमा करणे म्हणतात..