1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (12:49 IST)

एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडल्यास शहाण्याने काय करावं? वाचा बिरबलचं उत्तर

एकदा एका राजाच्या दरबारात काम करीत असताना राजाने विचार केला की माझ्या या दरबारात बिरबलच आहे जो फार हुशार आहे, चला तर मग आज मी त्याची परीक्षा घेउन बघतो. आणि असा विचार करीत आपले काम थांबवून तो बिरबलाला विचारतो "बिरबल जर कधी तुझी एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर तू काय करशील"? 
 
बिरबल कामात होते एकाएकी राजा कडून त्याला अश्या प्रश्नांची अपेक्षाच नव्हती. त्याला फार राग आला पण राजाला उत्तर देणं पण महत्वाचे होते. त्यांनी उत्तर दिले की "महाराज मी आपणास ह्याचे उत्तर नक्की देणार." असे म्हणून तो आपले काम संपवून राजाची आज्ञा घेऊन आपल्या घरी येतो. आणि आपल्या एका मित्राला बोलावतो. आणि सांगतो की मित्र उद्या तू दरबारात ये आणि राजा तूला काही प्रश्न विचारतील, पण तू काहीही बोलायचे नाही. अजिबात उत्तर द्यायचे नाही. असे केल्यास मी तुला बक्षीस देणार. 
 
दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राला घेऊन बिरबल दरबाऱ्यांत जातो आणि राजाला म्हणतो की "महाराज माझा हा मित्र आपल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणार. आपण त्याला प्रश्न विचारा. राजाने त्याला विचारले की सांग "एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडल्यास शहाण्याने काय करावं" बिरबलचा मित्र काहीही न बोलता गप्प राहिला. तो एकाच जागी उभारून हालचाल करे, पण राजाने पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर काहीही उत्तर देत नसे. शेवटी राजा फार चिडला आणि बिरबलाला म्हणाला की "बिरबल तुझा हा मित्र तर काहीच बोलत नाही." बिरबल नम्र होऊन उत्तर देतो की महाराज माझा हा मित्र कधी पासून आपण विचारलेल्या प्रश्नाचेच उत्तर देत आहे. राजा ने विचारले की कसे काय? तेव्हा बिरबल म्हणे की राजा आपण विचारले की "नालायक माणसाशी गाठ पडल्यावर काय करावं" त्यावर त्यांनी गप्प राहून उत्तर दिले की गप्प राहावं.
 
अश्या प्रकारे राजाला सडेतोड उत्तर मिळालं. राजा मनात फार खुश झाला आणि त्याला बिरबलाच्या बुद्धीमानीचा गर्व झाला.