गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified मंगळवार, 29 जून 2021 (14:41 IST)

हिंग भेसळ चाचणी, बनावट हिंग कसे ओळखाल

अन्नाची चव वाढवायची असो किंवा आरोग्याची काळजी घ्यायची असो, हिंग हे दोघांसाठी चांगले काम करते. इतकेच नव्हे तर आयुर्वेदात बरीच औषधे तयार करण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. परंतु आपणास माहित आहे का की हिंग बर्‍याच रोगांना दूर करतं परंतु ते बनावट असल्यास आपल्या आरोग्यास फायदा होण्याऐवजी नुकसान करु शकतं. अशा परिस्थितीत बाजारातून खरेदी करताना चांगली व सुगंधी हिंग कशी ओळखावी ते जाणून घ्या.
 
वास्तविक आणि बनावट हिंग ओळखण्यासाठी या पद्धतींचे अनुसरण करा-
शुध्द हिंग पाण्यात विरघळतो व पाण्याचा रंग पांढरा होतो. जर तसे नसेल तर मग समजून घ्या की हिंग बनावट आहे.
हिंग जाळून देखील ते खरं की बनावट आहे याचा शोध घेता येतो. 
वास्तविक हिंग बर्न केल्यावर त्याची ज्योत चमकदार होते आणि हिंग सहजतेने जळतो. पण खोटं हींग सहज जळत नाही.
एकदा खरा हिंग हातात घेतला, साबणाने हात धुतल्यानंतरही, त्याचा वास बराच काळ येत राहतो. पण बनावट हिंगाचा गंध पाण्याने हात धुतल्यानंतरच निघून जातो.
 
हिंगाचा रंग-
जर आपण बाजारातून हींग खरेदी करणार असाल तर लक्षात घ्या की वास्तविक हिंगाचा रंग हलका तपकिरी आहे. हिंगाची खरी ओळख पटण्यासाठी तुपात हिंग घाला. तूपात हिंग फुगू लागते आणि त्याचा रंग किंचित लाल होतो. जर असा बदल आणि रंग हिंग मध्ये दिसत नसेल तर तो बनावट आहे.
 
हिंग पावडर किंवा तुकडे-
बाजारातून हिंग खरेदी करताना चूर्ण हिंगऐवजी हिंगची पेंडी खरेदी करा. आपण घरी आरामात हिंगाची पावडर तयार करु शकता. चूर्ण हिंगमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. किंमतीत देखील पावडर हिंग अधिक स्वस्त असतं.
 
हींग खरेदी करताना
उघडलेले किंवा आधीपासून तुटलेला हिंगाचा खडा खरेदी करणे टाळा. हिंग खूप लवकर शिजतो. अशावेळी त्याची चवही खराब होते. हिंग नेहमीच कागदामध्ये गुंडाळून खरेदी करा आणि टिन किंवा काचेच्या बरणीत बंद करुन ठेवा. हिंग घरातही याच प्रकारे स्टोअर करा.