मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Updated : मंगळवार, 30 जानेवारी 2024 (11:34 IST)

Cooking Tips: लाडू बनवतांना या चूका करू नका

What to do to prevent lado from becoming hard
जेव्हा थंडीचे दिवस येतात आपण तीळ पासून ते नारळ, ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवतो. तर काही लोक बाजारातून लाडू आणून खातात. कधी कधी घरी लाडू बनवताना ते चांगले बनत नाही. लाडू बनवतांना आपण नेहमी काहीतरी चूक करतो. चला जाणून घेवू या.
 
सुखमेवा आणि मसाले भाजणे -
काही लोक सुखमेवा किंवा मसाल्यांना भाजत नाही आणि ते पदार्थात वापरतात. असं केल्याने यामुळे ते मऊ होतात आणि त्यांचा स्वाद कमी होतो. साहित्य चांगले भाजून घेणे  जेणे करून लाडवांची चव खूप छान लागेल. 
 
साहित्य गॅस मोठा करून भाजणे- 
आपण हे तर जाणतोच की लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य भाजून घेणे आवश्यक आहे. कधीपण साहित्य मोठया गॅस वर भाजू नये. अनेकदा आपण असे करतो. असं केल्याने साहित्य करपतात. 
 
साखरेच्या पाकावर खास लक्ष देणे- 
जर साखरेचा पाक जास्त घट्ट किंवा पातळ होत असेल तर त्या मुळे लाडवाच्या आकारावर परिणाम होतो. लाडू एकतर तो नरम होतो किंवा जास्त कडक होतो. साखरेचा पाक व्यवस्थित बनवला पाहिजे.
 
दूध किंवा तूप कमी टाकणे- 
लाडू बनवतांना रेसिपीमध्ये दूध कमी टाकले जाते किंवा टाकतच नाही. काही लोक यांत तूप टाकत नाही. ज्यामुळे लाडवाचे सारण घट्ट होते आणि लाडू खूप कडक बनतात व ते खातांना चांगले लागत नाही.