सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (16:23 IST)

पावसाळ्यात लोणच्यामध्ये बुरशी येते, या टिप्स लोणचे खराब होण्यापासून वाचवतील

जेवण्याच्या ताटात बाजूला वाढलेलं लोणचे केवळ भूक वाढवत नाही तर जेवणाची चवही वाढवतं. परंतु पावसाळ्यात बऱ्याचदा लोणच्यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये बुरशी येते. ही बुरशी केवळ अन्नाची चव खराब करत नाही तर आरोग्याला हानी पोहोचवते. जर तुम्हाला देखील पावसाळ्यात या प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर या टिप्सचे अनुसरण करा.
 
साहित्य आणि भांडी पूर्णपणे कोरडे असावे-
जेव्हा तुम्ही लोणचे बनवता तेव्हा खात्री करा की लोणचे बनवण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य आणि भांडी देखील चांगले सुकलेले आहे नाहीतर पावसाळ्यात उच्च आर्द्रतेमुळे लोणचे पाणीदार होते आणि ते लवकर खराब होऊ लागते. याशिवाय, लोणच्याला अधूनमधून सूर्यप्रकाश दाखवा.
 
लोणच्यामध्ये अतिरिक्त तेल आणि मीठ घाला-
बऱ्याच वेळा लोणच्यामध्ये तेल आणि मसाल्यांच्या कमतरतेमुळे ते खराब होऊ लागतं. याशिवाय, लोणच्यामध्ये तेल नीट मिसळले नसतानाही लोणच्यामध्ये बुरशीही येते. लोणचे बुरशीपासून वाचवण्यासाठी, त्यात थोडे अधिक तेल आणि मीठ मिसळा. लोणचे तेलात चांगले बुडेल याची खात्री करुन घ्या. असे केल्याने त्याला बुरशी येत नाही.
 
बुरशीपासून वाचवण्यासाठी लोणचे असे साठवा-
लोणचे नीट साठवून ठेवता येत नसल्यामुळे ते फार काळ टिकत नाही आणि त्याला बुरशी येऊ लागते. लोणचे नेहमी काचेच्या पात्रात किंवा चीनीच्या बरणीत स्टोर केले पाहिजे. लोणचे कधीही प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवू नका. यामुळे बुरशीसह लोणच्यामध्ये दुर्गंधी देखील निर्माण होते.
 
या गोष्टी लक्षात ठेवा -
लोणचे काढण्यासाठी कोरड्या चमच्याचा वापर करा.
लोणचीची मोठी भांडी पुन्हा पुन्हा उघडण्याऐवजी रोजच्या वापरासाठी वेगळ्या छोट्या भांड्यात थोडे लोणचे काढा.
जर तुम्हाला थोड्या प्रमाणात लोणचे साठवायचे असेल तर तुम्ही ते बुरशीपासून वाचवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये साठवू शकता.
लोणचे बनवण्यापूर्वी सर्व मसाले हलके भाजून घ्यावेत, ज्यामुळे ओलावा दूर होतो.