सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (10:57 IST)

पतीचे मन दुखावू शकता आपल्या या सवयी

दांपत्य जीवनात लहान-सहान वाद, भांडण सामान्य बाब आहे तरी वाद घालताना शब्दांची निवड करताना अलर्ट असलं पाहिजे. कारण आपण रागाच्या भरात बोलत असाल तरी एक शब्द पतीच्या मनाला दुखावू शकतं आणि याने आपल्या नात्याचं भविष्य बिघडू शकतं. कारण वाद मिटला तरी अनेकदा त्या दरम्यान आपण बोलून गेलेले शब्द पतीच्या मनातून काही निघत नाही. अशात जाणून घेणे आवश्यक आहे की आपल्या कोणत्या गोष्टी त्यांच्या मनाला वेदना देऊ शकतात-
 
व्यावहारिक धोरण नाही
अनेकदा नवरा आपल्या व्यावसायिक जीवनात व्यस्त असल्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देण्यात सक्षम नसतो अशात त्याला व्यावहारिक ज्ञान नाही असे म्हटल्यावर त्याला स्वत:ची लाज वाटू लागेल आणि आपल्यात इतके साधे गुण नाही असे जाणवू शकतं.
 
कुटुंबाविषयी अपशब्द
वाद घडला आणि सर्वात आधी खानदानावर वाद सुरू होतात. तुझ्या घरात तर सगळेच असे आहे असे म्हणत सर्वांच्या वाईट सवयी मांडल्याने आपली भडास निघत असली तरी पतीच्या मनात या गोष्टी सुईप्रमाणे नेहमी टोचत राहतात.
 
कामावर आणि व्यस्ततेवर थट्टा
ऑफिस किंवा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नेहमीच हे ऐकावं लागतं की कुटुंबासाठी वेळ नाही. परंतू कार्यक्षमतेवर थट्टा करणे महागात पडू शकतं. 
 
बेजबाबदार
आपल्या व्यस्त जीवनातून शक्य तितका वेळ कुटुंब आणि मित्रांना देणार्‍या पतीला शिल्लक कारणांसाठी बेजबावदार ठरवणे त्यांचा आत्मविश्वास, सन्मानाला घालून पाडून बोलण्यासारखे आहे.
 
एकूण वाद घालताना शब्दांचा तोल जाऊ नये याची काळजी घ्यावी कारण शेवटी काय मनुष्य आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी झटपट असतो.