शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By

मोदींचे बोहरा समाजाशी हे नातं

मुस्लिमांमध्ये बोहरा समाज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते सर्वांना माहीतच आहे. देशातील मुस्लिम भाजपला मत देत नसले तरी गुजरात सीएम असताना मोदींनी व्यापार्‍यांच्या चांगल्यासाठी मांडलेल्या योजनांमुळे मुस्लिम त्यांसोबत जुळले आणि आजदेखील त्यांच्यासोबत आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत लोकप्रिय असली तरी मुस्लिम समाजात त्यांच्या लोकप्रियतेबाबत ठामपणे विश्वास दर्शवता येत नाही. तरी मुस्लिम समुदायातील एक भाग असा आहे जो आधीपासून मोदींसोबत उभा आहे.
 
पीएम मोदी पहिल्यांदा सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या इंदूरमध्ये आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. बोहरा समाजासाठी इतिहासात पहिल्यांदा असेच घडले जेव्हा एखाद्या पीएमने त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. याने बोहरा समुदाय आणि मोदी यांच्यातील नातं समजले जाऊ शकतं.
 
गुजरातमध्ये मुस्लिम समुदायाचे सुमारे 9 टक्के लोकं राहतात. यातून बोहरा समुदाय केवळ 1 टक्के असून व्यवसायी आहे. गुजरात येथील दाहोद, राजकोट आणि जामनगर यांचे क्षेत्र आहे असेही म्हणता येईल. 2002 च्या गुजरात दंगा दरम्यान बोहरा समजातील लोकांच्या दुकानी जळाल्या गेल्या होत्या. यामुळे त्यांना खूप नुकसान झाले होते. तेव्हा विधानसभा निवडणुकीत बोहरा समुदायाने भाजपाचे विरोध केले होते तरी मोदीने वापसी केली. नंतर मोदींनी व्यापार्‍यांसाठी आखलेल्या नीतींमुळे हा समुदाय मोदींशी जुळला.
 
मध्यप्रदेशात काही महिन्यातच विधानसभा निवडणुक होणार असून इंदूरच्या 4 नंबर सीटवर बोहरा समाजातील सुमारे 40 हजार लोकसंख्या आहे. या व्यतिरिक्त इतर तीन सीट्स अश्या आहेत जिथे 10 ते 15 मत बोहरा समुदायाचे आहे. याव्यतिरिक्त उज्जैन शहरातील सीटवर बोहरा समाजाचे 22 हजार वोटर्स आहे. उल्लेखनीय आहे की देशभरात 20 लाख हून अधिक बोहरा समुदायाचे लोकं आहेत.