माओवाद्यांच्या बाबतीत आता सगळ्या शंका मिटल्या असतील, असे मानायला हरकत नाही. सामाजिक- आर्थिक विषमता आणि न्याय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारतातील आदिवासी-वनवासींसाठी बंदूक उचलण्याचा दावा करणारे माओवादी प्रत्यक्षात सत्तेचे भुकेले आहेत हे आता स्पष्ट ...
गरीब परिस्थिती व शिक्षणाचा अभाव ही नक्षलवादाची मुख्य कारणे मानली जातात. परंतु, कोबाड गांधींसमोर अशी काहीही परिस्थिती नव्हती. तरीही ते नक्षलवादाकडे वळाले. लंडनमध्ये झालेले शिक्षण, गडगंज पैसा, दिवंगत कॉग्रेस नेते संजय गांधी यांच्याशी मैत्री ही ...
छत्तीसगडमधील दंतेवाडात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याची भयाण परिस्थिती आता पत्रकार तिथे पोहोचल्यानंतर स्पष्ट होत आहे. सीआरपीएफच्या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत नक्षलवाद्यांशी संघर्ष केला. जखमी झाल्यानंतरही त्यावर कापड बांधून तीन तास हे जवान लढत ...
छत्तीसगडच्‍या दंतेवाडा येथील जंगलांमध्‍ये झालेल्‍या नक्षलवादी हल्‍ल्‍याने अनेक प्रश्‍न उपस्थित केले असून नक्षलवादी पूर्वनियोजन करून एवढा मोठा हल्‍ला घडवून आणू शकतात याची जाणीव असतानाही तशी खबरदारी का घेतली गेली नाही. असा मुख्‍य प्रश्‍न या निमित्ताने ...
नवी दिल्ली- नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहे. ही मदत कोणत्या माध्यमातून केली जाते हे अद्याप अस्पष्ट असले तरी नक्षलवादी बनण्यासाठी आदिवासी युवकांना तीन हजारांचे आमिष दाखवले जात आहे. अर्थात नक्षलवादी तीन हजारात तरुणांना नोकरीवर ठेवत ...
भारताचा पूर्व भाग नक्षलवाद्यांनी पार पोखरून काढला आहे. नक्षलवादी कारवाया इतक्या वाढल्या आहेत की भारत सरकारचे अस्तित्व तेथे आहे की नाही असा प्रश्न पडतो. आगामी काळात तिथे खलिस्तान किंवा काश्मीरसारखी विघटनवादी चळवळ सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
मागील काही दिवसांपासून देशातील नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. नक्षलवाद्यांनी मागील चार वर्षांमध्ये केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तीन हजारांवर बळी गेले आहेत.