मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. नक्षलवाद
Written By वेबदुनिया|

नक्षलवादी हिंसाचारात तीन हजारांवर बळी

WD
WD
मागील काही दिवसांपासून देशातील नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. नक्षलवाद्यांनी मागील चार वर्षांमध्ये केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तीन हजारांवर बळी गेले आहेत.

भारतात छत्तीसगड, बिहार, झारखंड व ओरिसात नक्षलवाद सध्या फोफावत आहे. या राज्यांमध्ये 2006 ते ऑगस्ट 2009 पर्यंत 2,212 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या कालावधीत 5,800 नक्षलवादी घटना घडल्या असून, नक्षलवाद्यांचे वाढते प्रस्थ पाहता केंद्र सरकारनेही त्यांच्या विरोधात ऑपरेशन ग्रीन हंटची सुरुवात केली आहे.

छत्तीसगडमध्ये 2006 साली 715 नक्षलवादी घटनांमध्ये 388 जणांचा बळी गेला होता. 2007 मध्ये 369, 08 मध्ये 242 तर ऑगस्ट 2009 पर्यंत 180 जणांचा यात बळी गेला. सरकारने मागील काही दिवसांपासून नक्षल विरोधी अभियान सुरू केल्यानंतर मृतांची संख्या आणखी वाढली आहे.

माओवाद्यांनी झारखंडमध्ये केलेल्या हल्ल्यात 2006 मध्ये 124, 2007 मध्ये 157, 08 मध्ये 207 तर 2009 मध्ये 150 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.