गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (22:38 IST)

झटपट तयार करा चविष्ट चिकन सूप

हे सूप भाज्यांनी नव्हे तर चिकन पासून तयार केले जाते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य -
300 ग्रॅम चिकन,कांदा,पाणी,तिखट,आलं-लसूण पेस्ट,लिंबाचा रस,दोन चमचे सोया सॉस,साखर,मीठ.
 
कृती- 
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवा.त्यात आलं लसणाची पेस्ट घाला.चिरलेला कांदा घाला.पाण्याला उकळी आली की त्यात चिकन,तिखट,घालून शिजवा.20 मिनिटे शिजवल्यावर हे घट्ट होईल.त्यात मीठ,साखर,सोयासॉस,लिंबाचा रस घालून ढवळा आणि गरम सूप सर्व्ह करा.