शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (23:52 IST)

देशील आधार का रे तू मला!

विचारी वल्लरी एकातरू ला,
देशील आधार का रे तू मला!
त्यायोगे बहरिन मी ही रे,
आधाराने वर वर जाईन रे,
हसून तरू ने दिली संमती,
सुखावली ती ,आली भोवती,
तरारून वाढू लागली भरभर,
तरूस व्यापून टाकले सत्वर,
फांदो फांदी ती दिसू लागली,
तरू ची वाढ मात्र सीमित झाली,
हळूहळू तो ही ग्रस्त जाहला,
का  हात दिला ?मनी बोलला
वाळून गेला तो एकेदिवशी पार,
तिनं केला त्याच्या अस्तित्वा वर वार,
असा झाला अंत तरू चा दारुण,
वल्लरी ने मात्र घेतली संधी साधून!
.....अश्विनी थत्ते