शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (15:50 IST)

एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!

love
काहीतरी तुज सांगावं, म्हणून कागदावर लिहिलं,
तू फक्त शब्दच वाचले, बाकी न तुज समजलं,
भावना माझ्या तुजपाशी न पोहोचल्या,
शब्दांत ही सांगू न शकले, लिहिलेल्या न समजल्या,
कळायला हवी न कधी अव्यक्त  कुणाची भावना,
हृदयात प्रेम असावं लागतं, बोलायची गरज नसावी ना!
अबोलचं राहीले माझे प्रेम, न कधी बोलले ,
हृदयातच राहीले मिटून, कधी न उमलले,
आतां मज असं वाटे, बोलावयास हवं होतं !
पण नसेलच तू माझा, म्हणून च तसं घडत होतं!
अंतरी अजूनही ती सल आहे,मज बोचते,
एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!
..अश्विनी थत्ते