शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (20:38 IST)

Marathi Kavita स्वागतास तत्पर मी,झाले आतुर

अवती भवती होते फुलें च सारे,
अंगा झोम्बतेय मज थंडगार वारे,
डोळ्यांत स्वप्न फुलपरी उमलले,
गालावर अवचित हास्य ते फुलले,
खुडावे फुलं खूप परडी भरुनी,
सजवावी पाऊलवाट,फुलं सजवूनी,
येईल साजण गे माझा त्या वाटेवर,
स्वागतास तत्पर मी,झाले आतुर.
सांगीन भेटल्यावर गुज माझ्या मनाचे,
नव्हतास तू, काय झालेत हाल या जीवाचे,
अशीच व्हावी मी आतुर, तुज भेटाया,
सांगीन नवीन काही, येशीलच तू ते ऐकाया!
....अश्विनी थत्ते