शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालदिन
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (09:39 IST)

Children's Day महत्वाकांक्षी असावं तुम्ही, बाळगा इच्छा अनंत

Children’s Day Quotes
खूप हसा, खूप बागडा हे चिमुकल्यानो,
घ्या भरारी आकाशी, तुम्ही रे पिलांनो,
बघा स्वप्न, पोहोचा तुम्ही सहज त्यापर्यंत,
महत्वाकांक्षी असावं तुम्ही, बाळगा इच्छा अनंत,
पण माणूस म्हणून तुम्ही जपा एक निर्मळ मन ,
विसरू नका माणुसकी,करा तीस जतन,
दया, ममता असुद्या अंगी, करी समाजास भक्कम,
बांधिलकी म्हणून करावं कार्य,व्हाल महानतम !!
....अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi