रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

ऑफिसचा पहिला दिवस!

ऑफिस जॉइन करायचा पहिला दिवस असेल तर उत्सुकता आणि भीतीसुद्धा मनात असते. सहकार्‍यांशी आपले संबंध कसे राहतील? ऑफिसातील लोक आपले मित्र बनतील की नाही? ते आपल्याशी कसे वागतील? आपल्याबद्दल काय बोलतील? अशा अनेक शंका-कुशंका मनात येत असतात. म्हणूनच ऑफिसमध्ये आपला प्रभाव चांगला पडावा यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे... 
 
ऑफिसमधील ड्रेसअप : 
 
ऑफिसमध्ये पहिलाच दिवस असेल तर तुम्ही प्रोफेशनल ड्रेस घालणे योग्य. 
तुमच्या पदावर तुमचा ड्रेस अवलंबून आहे. तुम्ही व्यवस्थापक पदावर असाल तर पँट- कोटाला प्राधान्य दिले पाहिजे. 
पुरुष डार्क रंगाच्या ट्राउजरसोबत हलक्या रंगांचे शर्ट घालू शकतात. चेक्सचे शर्टसुद्धा चालतील पण चेक्स जास्त मोठे नसावेत. 
मुली फॉर्मल ड्रेस घालू शकतात. साडी किंवा सलवार कमीज घालताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यांचे रंग जास्त डार्क नको. 
ओव्हर मेकअप करणे टाळावे. 
मुलांनी पहिल्या दिवशी बूट घालून जायला पाहिजे. बूट काळ्या रंगाचे असल्यास जास्त चांगले. 
ऑफिसमध्ये कुठलाही ड्रेस कोड नसला तरी पहिल्या दिवशी जीन्स घालून जाणे टाळावे. 
ऑफिसात पहिल्या दिवशी जास्त बोलू नये. कुठल्याही चर्चेवर लगेच आपली प्रतिक्रिया देणे टाळावे. आपले विचार त्यांच्यावर मांडू नये. 
आपल्या सहकार्‍यांबरोबर औपचारिकपणे आपला परिचय द्यावा. पहिल्याच दिवशी एकदम फ्रेंडली होऊ नये. आपल्या सहकार्यांना समजून 
घेण्याचा प्रयत्न करावा. 
जे लोकं तुमची मदत करत असतील त्यांना धन्यवाद देण्यास विसरू नये. कारण भवितव्यात कधीही गरज पडल्यास ते तुमची मदत नक्कीच करतील.
ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी उशीरा जाऊ नका. ऑफिसमधून निघतानासुद्धा वेळेचे लक्ष ठेवा. 
तुमचे विचार नेहमी सकारात्मक असावे. काम करताना आत्मविश्वास दिसून यायला पाहिजे. पहिल्या दिवशी जर ऑफिसमध्ये कुठल्याही समस्येला तोंड द्यावे लागले तर लगेच त्याची तक्रार करू नका. यामुले तुमची सहनशक्ती दिसून येते. 
पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये काम कमी देण्यात येते. तुम्ही तुमचे काम लवकर पूर्ण झाले तर लगेच दुसरं काम मागायला संकोच करू नका.