Home Tips : खास होम टिप्स  
					
										
                                       
                  
                  				  बरेचदा सेलोटेपचे टोक हातात सापडत नाही. अशा वेळी टेपचे बंडल फ्रीजमध्ये ठेवावे. म्हणजे त्याचे टोक सुटून वेगळे होते.
				  													
						
																							
									  
	 
	फ्लॉवरपॉटमध्ये फुले ठेवल्यानंतर पाण्यामध्ये अमोनियाचे काही थेंब टाकावे. यामुळे पाणी खराब होत नाही आणि फुलेही बराच काळ चांगली राहतात.
				  				  
	 
	लाकडी शोभेच्या वस्तूंवर अधूनमधून खोबर्याचे तेलात बुडवलेला बोळा फिरवल्यास पुन्हा नव्यासारख्या दिसतात.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	घरात अँल्युमिनियमचा पोळपाट असेल तर पोळ्या करताना सरकतो. अशा वेळी खाली ओला कपडा घातल्यास पोळपाट सरकत नाही आणि काम सोपं होतं.
				  																								
											
									  
	 
	भिंतीमध्ये खिळा ठोकायचा असल्यास तो गरम पाण्यात बुडवून ठेवावा. यामुळे ठोकताना सिमेंट पडत नाही आणि खिळा भिंतीत आतपर्यंत पोहोचतो.