शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (19:53 IST)

Mehndi Designs : मेंदीचे नवनवीन प्रकार

बदलणार्‍या काळात फॅशन बदलते आहे. मेंदीनेसुद्धा आपले रंग बदललेले आहेत. लग्नप्रसंगी किंवा कुठल्याही समारंभात मेंदी लावलेले हात सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतात. 
 
हल्ली स्त्रिया हातालाच नव्हे तर पाठ, दंड यावरही मेंदी लावतात. डिझायनर ड्रेस व ज्वेलरीबरोबरच डिझायनर मेंदीचा ट्रेंड आहे. आपण पाहूया काही ट्रेंडी डिझायनर मेंदीबद्दल. 
 
1. फँटसी स्टाइल मेंदी
फँटेसी मेकअपबरोबर आता तशाच स्टाइलची मेंदी लोकप्रिय झाली आहे. यात ड्रेस व ज्वेलरीच्या रंगांशी मेळ खात असलेल्या रंगांनी मेंदीची डिझाइन केली जाते. या मेंदीत फँटसी मेकअपचा प्रयोग केला जातो. नंतर डिझाइनच्या अनुरूप रंगबिरंगी खडे व कुंदनाचा प्रयोग करून सजवण्यात येते. ही मेंदी दिसायला फारच सुंदर दिसते. 
 
2. जरदौसी मेंदी
जरदौसी मेंदी सिल्व्हर किंवा गोल्डन शेडमध्ये असते. मेंदीने हातांवर सिल्व्हर किंवा गोल्डन रंगाने डिझाइन बनवण्यात येते. ही मेंदी फारच सुरेख दिसते.  
 
3. अरेबियन मेंदी
अरेबियन स्टाइलमध्ये जाड-जाड फुला-पानांची डिझाइन बनवण्यात येते. अरेबियन मेंदीत ब्लॅक केमिकलहून आऊट लाइन काढून हिरव्या मेंदीने शेडिंग केली जाते. काळ्या व लाल रंगांच्या मेंदीवर सुद्धा तुम्ही ड्रेसच्या रंग व डिझाइनच्या अनुरूप रंग-बिरंगी खडे व कुंदन लावू शकता.
 
4. राजस्थानी किंवा मारवाडी मेंदी
राजस्थानी व मारवाडी मेंदीसुद्धा फॅशनमध्ये आहे. या स्टाइलच्या मेंदीने सुद्धा बाजूंवर कड्याच्या आकाराचे डिझाइन बनवू शकता.
 
किंमत
अरेबियन मेंदीची किंमत 50 ते 100 रुपये एका हाताची आहे. डिझाइनप्रमाणे यांची किंमत वाढत जाते. फँटसी स्टाइलची किंमत थोडी जास्त असते.