शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

म्युरल्सची जादू

म्यूरल्स आणि पेंटिंग्जची निवड करताना घरातील भिंतींच्या रंगांबाबत बारकाईने विचार केला जातो. हे रंग विषयाप्रमाणे ठरतात. लाकडी म्युरल्ससाठी चकचकीत आणि ब्राईट दिसणारे ऑईलपेन्ट कलर वापरले जातात. राखाडी, पिवळा, सोनेरी आणि लाल असे कॉम्बिनेशन अधिक प्रमाणात वापरले जाते आणि ते उठूनही दिसते. सेपोरेक्समध्ये कोरलेल्या म्युरलसाठी सहसा एकाच रंगाचे शेडिंग केले जाते. शक्यतो गुलाबी, फिकट निळा, चंदेरी असे रंग ‍अधिक प्रमाणात वापरले जातात. म्युरलसाठी आवडीनुसार कोणताही प्रकार निवडता येतो. मात्र लाकडी म्युरल्ससाठी ऑईलपेन्ट वापरलेला असल्यामुळे ती नियमित पुसून स्वच्छ ठेवता येतात. सेपारेक्सची म्युरल्स त्या मानाने नाजूक असतात. तीक्ष्ण, धारदार वस्तुचा आघात झाल्यास त्याचे टक्के उडू शकतात. घरता लहान मुले असतील तर या म्युरल्सना फार जपावे लागते. घराच्या भिंती म्युरल्सने सजवताना वेगवेगळे प्रयोग करून पाहता येतात. भिंत भरून एकच पेटिंग्ज किंवा म्युरल हा सजावटीचा एक प्रकार आहे. या खेरीज छोटे छोटे पेटिंग्ज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेग्ळया कोनात मांडूनही भिंतीची सजावट साधता येते. मात्र अशा पेंटिंग्जचा विषय एकच असावा लागतो. अशा पेंटिंग्जची रचना दिवाणखान्यात आणि बेडरूममध्येही शोभून दिसते.

लाकडातील कारव्हिंग्ज काही वेळा झाडांच्या बुंध्याचे निसर्गत: असणारे आकार, विशिष्ट पद्धतीने खोडाला पडलेला पीळ किंवा मोठ्या खोडाला एखादा कट देऊन तयार झालेला बैठाल सपाट भाग असे आकार वापरले जातात. काही वेळा मोठ्या खोडामधील काही भाग पोखरून त्याला विविध आकार दिले जातात. असे आकार दिवाणखान्यातील सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्यांचा नैसर्गिक लूक तसाच ठेऊन टिकण्यासाठी त्यावर सहसा वॉर्निश पेन्ट लावला जातो. असे आकार केवळ सजावटीसाठी ठेवले जातात किंवा टीपॉय स्टॅड, होल्डर असे उपयोगही केले जातात.