suvichar

आमचाही एक जमाना होता....

Updated: शनिवार, 9 जुलै 2022 (13:37 IST)
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव 
असायचा...
 
वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.
 
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.   
 
कोणत्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून, आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही...
 
सरांचा शाळेत मार खाताना 
आणि पायांचे अंगठे धरुन 
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
'ईगो' कधीही आडवा 
येत नव्हता, खरं तर 
आम्हाला 'ईगो' काय 
असतो हेच माहीत 
नव्हतं...
 
मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खुष असायचे. 
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी 
आज कमी धोपटला गेलो 
म्हणून आणि मारणारा
आज पुन्हा हात धुवून 
घ्यायला मिळाले म्हणून......
 
बिनचपला, बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.
 
आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही
अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.
 
आम्ही आमच्या
आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला
आय लव यू' 
म्हणणं माहीतच नव्हतं...
 
आज आम्ही असंख्य 
टक्के टोमणे खात, संघर्ष 
करत दुनियेचा एक हिस्सा
झालोय. काहींना जे हवं 
होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?'
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि स्कूल बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,कुठे हरवलेत ते...!!!
 
आम्ही जगात कुठेही 
असू पण हे सत्य आहे की, 
आम्ही वास्तव दुनियेत 
जगलो, आणि वास्तवात 
वाढलो........
 
कपड्यांना सुरकुत्या पडू 
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं 
आम्हाला कधी जमलंच 
नाही.
 
भाकरी आणि कालवना शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.
 
आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला  जगायला मदत करतायत.
 
जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही"....
 
आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण आमचाही 
एक 'जमाना' होता..... 
 
- सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

ताकात चिया बिया मिसळून प्या; शरीराला मिळतील हे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे!

रेचक औषधे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीर तंदुरुस्त ठेवतात

प्रेरणादायी कथा : गुरु आणि शिष्य; कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळते

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी तसेच स्टॅमिना सुधारण्यासाठी वेलची: एक नैसर्गिक वरदान

पुढील लेख
Show comments