Festival Posters
✕

"गोडवा"

Updated: बुधवार, 26 मे 2021 (13:30 IST)
 
सध्या कोरोना काळात कामवाल्या मावशी सुट्टीवर. आता घरातील सर्व कामांची जबाबदारी सुमेधावरच. सकाळपासून आवराआवर, न्याहारी, धुणीभांडी, स्वयंपाक सर्वच कामं आली! हे सर्व उरकून दमायला व्हायचे पण तरी ती लेखनासाठी वेळ काढतंच होती. आजही तिचा एक लेख प्रसिद्ध वर्तमान पत्रात प्रकाशित झाला होता. सकाळपासून शुभेच्छांचे फोन यायला सुरुवात झाली. हातात कधी केरसुणी तर कधी लाटणं आणि फोनवर बोलण्यासाठी कानात हेडफोन लावून ती खिंड लढवत होती. सासूबाई सर्व बघत होत्या. तश्या त्यापण खूप मदत करायच्या. सुमेधाची साहित्य क्षेत्रात झालेली प्रगती त्यांना आवडत नसे असेही नाही पण एकदा लग्न झालं की बायकांनी संसारातंच लक्ष द्यायला हवे, अशी काही त्यांची विचारसरणी होती.
 
घरची सर्व कामं उरकून, मुलांचा ऑनलाईन अभ्यास सांभाळून सुमेधा रात्री एक वाजता लॅपटॉप घेऊन साप्ताहिक सदर टाईप करायला बसली. तेवढ्यात तिला स्वयंपाक घरात काही आवाज आला. जाऊन बघते तर सासूबाई चहा करत होत्या. तिने विचारले, "आई एवढ्या रात्री काय करत आहात?" 
"आता थकल्यावर चहा प्यायची इच्छा झाली तर करणार कोण अन् सांगणार कोणाला?" सासुबाई म्हणाल्या.
 
सुमेधाला जरा वाईटच वाटलं, पण तरी स्वतःला सावरत म्हणाली, "आई चहा प्यायचा असेल तर सांगा न, मी करून देते. त्यात काय?" 
 
"अगं मला नको. मी तुझ्या बद्दल बोलतेय! रात्रीची लिहायला बसलीस, चहा घे. जरा तरतरी येईल. तुम्ही आजकालच्या मुली न! फार जिद्दी..पण खरंच हुशार हं.... घर सांभाळून ही आपले अस्तित्व निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे तुम्हालाच जमतं बाई..! 
घे अन् जास्त जागू नको." हातात चहाचा कप देऊन त्या खोलीत निघून गेल्या.
 
सुमेधाला हा अनपेक्षित हवाहवासा आयता चहा अधिकच गोड लागत होता....

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

पुढील लेख
Show comments