शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified शनिवार, 29 मे 2021 (18:40 IST)

खरबूजा ची चविष्ट खीर

खीर म्हटले की रवा,तांदूळ,शेवया,चे नावं ओठी येत.आज आम्ही सांगत आहोत खरबुजाची चविष्ट खीर ही बनवायला सोपी आहे आणि चविष्ट देखील आहे.चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
250 ग्रॅम शिजवलेले तांदूळ,250 ग्रॅम खरबूजाचं गर,250 ग्रॅम कंडेस्ड मिल्क,2 चमचे साखर,1 लिटर दूध,बदाम,काजू,केसर.
 
कृती- 
एका पॅनमध्ये दूध उकळावं. त्यात शिजवलेला तांदूळ घाला.ढवळा,शिजवून घ्या.त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून चांगले ढवळा आणि 2 मिनिटे शिजवा.यात खरबुजाचे गर घाला आणि मध्यम आंचेवर 5-10 मिनिटे शिजू द्या.हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यावर ही खीर केसर,बदामाने सजवून थंडगार सर्व्ह करा.