शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

होळी स्पेशल : अमृतखंड

साहित्य : एक लि. दूध, एक वाटी साखर, एक वाटी आंब्याचा गर, वेलची पूड, केसर.

कृती : दुधात साखर घालून ते अर्धा लिटर होईपर्यंत आटवा. दूध थंड करून त्यात वेलची पूड आणि केशर घालून फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. एक कैरी उकडून त्याचा एक वाटी गर काढून थंड करा. आटवलेल्या दुधात थंड कैरीचा गर घालून सर्व नीट एकत्र करून घ्या. हे अमृतखंड थंडच वाढावे.