पिस्ता बर्फी रेसिपी
साहित्य-
एक कप पिस्ता
एक कप साखर
अर्धा कप दूध
अर्धा कप तूप
अर्धा चमचा वेलची पूड
चांदी वर्क
कृती-
सर्वात आधी पिस्ता स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवावा. त्यानंतर भिजलेल्या पिस्त्याचे साल काढून जाडबारीक मिक्सरमध्ये दळून घ्या. आता एका कढईमध्ये एक कप साखर आणि अर्धा कप दूध घालून उकळून घ्यावे. आता साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालावे व मिक्स करावे. आता यामध्ये बारीक केलेला पिस्ता घालावा व ढवळावे. तसेच वेलची पूड घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे. त्यानंतर आता एका प्लेटला तूप लावून घ्यावे. तयार मिश्रण प्लेटमध्ये पसरवावे. व वरतून सजावट करिता चांदीचा वर्क लावावा. थंड झाल्यानंतर या मिश्रणाला तुम्हाला हवा तो आकार देऊन कट करावे तर चला तयार आहे आपली पिस्ता बर्फी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik