Daily Horoscope
✕

रक्षाबंधन विशेष पारंपरिक मिठाईला द्या मॉडर्न टच! भावासाठी बनवा या ट्रेंडी स्वीट डिशेस

Updated: मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 (17:08 IST)
 

इन्स्टंट नारळ-चॉकलेट लाडू (Chocolate Coconut Ladoo)

साहित्य: २ कप ओल्या नारळाचा चव (किंवा डेसिकेटेड कोकोनट), १/२ कप कंडेन्स्ड मिल्क, २ चमचे कोको पावडर (किंवा मेल्टेड रोझ/डार्क चॉकलेट) आणि तूप.
कृती: कढईत थोडे तूप गरम करून नारळाचा चव २ मिनिटे परता. त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रणाचे दोन भाग करा; एका भागात कोको पावडर मिसळा. हाताला थोडे तूप लावून दोन्ही रंगांचे मिश्रण एकत्र करून लाडू वळा. वरून सुक्या नारळाच्या चवात घोळवून फ्रिजमध्ये ठेवा.
 

मँगो/पिस्ता सन्देश (Fusion Sandesh)

साहित्य: १ कप फ्रेश पनीर (छेने), ३-४ चमचे पिठीसाखर, मँगो प्युरी किंवा पिस्ता पेस्ट आणि केशराचे दूध.
कृती: पनीर मऊ होईपर्यंत हाताने चांगले मळून घ्या. मंद आचेवर कढईत मळलेले पनीर आणि पिठीसाखर २-३ मिनिटे परता (जास्त शिजवू नका). मिश्रण कोमट झाल्यावर त्यात मँगो प्युरी किंवा पिस्ता पेस्ट मिसळा. याचे छोटे पेढे किंवा साच्यात घालून डिझाईन बनवा आणि वरून केशर-पिस्त्याने सजवा.
 

रबडी घेवर (Rabri Ghevar) 

साहित्य: बाजारात मिळणारे रेडीमेड मिनी घेवर, घट्ट केशर रबडी, बारीक चिरलेले बदाम-पिस्ता आणि चांदीचा वर्क.
कृती: जर वेळ कमी असेल, तर रेडीमेड अळणी किंवा गोड मिनी घेवर आणा. त्यावर घरगुती केशर-वेलचीची घट्ट रबडी पसरा. वरून भरपूर ड्रायफ्रूट्स, गुलाबाच्या पाकळ्या आणि चांदीचा वर्क लावून रॉयल लुक्समध्ये सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: रक्षाबंधनला भावासाठी बनवा कोको ऑरेंज बाइट रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

पुढील लेख
Show comments