रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (16:44 IST)

ह्या Vastu Tipsचा प्रयोग करा आणि गाढ झोप घ्या

माणसांसाठी झोप तेवढीच गरजेची आहे जेवढे खाणे पिणे. रात्री झोप न येणे आज सर्वात मोठी समस्या आहे. झोप पूर्ण न झाल्याने माणूस दिवसभर तणावात राहतो व त्याचे मन कुठल्याही कामात लागत नाही. जर तुम्ही तणावात राहत असाल, रात्री झोप लागत नसेल तर आम्ही तुम्हाला वास्तूचे काही उपाय सांगत आहोत ज्याचा वापर करून तुम्ही गाढ झोप घेऊ शकता. 
 
1. वास्तूनुसार रात्री झोपताना बेडरूममध्ये देशी तुपाचा दिवा लावून झोपायला पाहिजे.  
2. घरातील सर्व मंडळीने एकत्र बसून भोजन केले पाहिजे असे केल्याने मन शांत राहत आणि तुम्हाला आनंदही मिळतो.  
3. बेडरूममध्ये बसून कधीही जेवण नाही करायला पाहिजे व खरखटे भांडे देखील बेडरूममध्ये ठेवणे वर्जित आहे.  
4. बेडरूममध्ये कधीही झाडू नाही ठेवायला पाहिजे, असे केल्याने आपसातील विश्वास कमी होतो.