मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (15:44 IST)

घरात तुळस असेल तर हे नियम जाणून घ्या

basil leaves
सर्वांची तुळशीबद्दल विशेष धार्मिक आस्था असते. अशात तुळशीच्या संदर्भात काय योग्य आणि काय नाही ते जाणून घेतले पाहिजे-
 
ज्या घरात तुळस असते त्या घरात सकारात्मकता, सुख-समृद्धी नांदते असे मानले जाते. अशात लोक घरात तुळशीचं रोप लावतात पण ते लावताना काही नियम माहित असावे. 
 
तुळशीजवळ स्वच्छता
तुळस अत्यंत पवित्र मानली जाते अशात तुळशीच्या कुंड्याजवळ स्वच्छता असणे गरजेचे आहे. नाहीतर घरात नकारात्मक ऊर्जा पसरु लागते.
 
तुळस वाळू नये
धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीचे रोप वाळणे अत्यंत अशुभ मानले जाते. तुळशी सुकली की घरात अडचणी येऊ लागतात असे म्हणतात. अशा परिस्थितीत तुळशीच्या रोपाला नियमित पाणी देणे आणि तिची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच तुळशीचे रोप अशा ठिकाणी लावले पाहिजे की त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.
 
येथे ठेवू नये तुळस
घराच्या मुख्य दारावर तुळस ठेवू नये. येथे तुळस ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते आणि वास्तु दोष लागण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
 
जवळ ही झाहे नकोत
बेलपत्राचे रोप तुळशीच्या रोपासोबत किंवा त्याच्या आजूबाजूला लावू नये असे मानले जाते. घरामध्ये ही रोपे आधीच लावलेली असतील तर ती दोन्ही झाडे लगेच काढून टाकावीत. तुळशी आणि बेलपत्राची रोपे एकत्र ठेवणे चांगले मानले जात नाही. तसेच निवडुंग किंवा कोणतीही काटेरी झाडे ठेवू नयेत.
 
घरात किती तुळशीचे रोपे लावू शकतो?
वास्तुनुसार तुळशीचे रोप घरामध्ये विषम संख्येत लावणे चांगले मानले जाते. उदाहरणार्थ तुळशीची लागवड एक, तीन किंवा पाच अशा गटात करावी. तुळशीची सम संख्येची रोपे लावण्याची शिफारस केलेली नाही.
 
कोणत्या दिवशी तुळशीला तोडू नये?
घरात सूतक असल्यास अर्थात कोणाचा जन्म झाल्यावर तसेच बाळाचे नाव ठेवेपर्यंत तसेच कोणाचा मृत्यू झाल्यास तेराव्या दिवसापर्यंत तुळशीची पाने तोडू नयेत. शास्त्रानुसार, संक्रांती, एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना देखील तुळशीचे पाने तोडू नये. याशिवाय मंगळवार, रविवार आणि शुक्रवारी तसेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही तुळशीची पानं तोडू नयेत.